आपल्या प्रत्येकाजवळ आता मोबाईल असतो. या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे अॅप आपन डाऊनलोड करतो. ऑनलाइन शॉपिंग असो की ऑनलाइन फूड बुकींग सर्व प्रकारचे अॅप आहेत. परंतु कधीकधी धोकादायक अॅपसुद्धा डाऊनलोड केले जातात. परंतु त्या अॅपची माहिती आपणास नसते. जवळपास सर्वच अँड्रॉईड युजर ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store चा वापर करतात. परंतु फोनमध्ये कोणतेही धोकादायक ॲप डाऊनलोड झाल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते. अनेक वेळा सायबर गुन्हेगार हॅकीगच्या माध्यमातून आपल्या फोनवर धोकादायक ॲपही डाउनलोड करतात. त्यामुळे आपली फसवणूक होते.
गुगल प्ले स्टोअर करणार मदत
गुगल प्ले स्टोअर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील धोकादायक ॲप शोधण्यासाठी मदत करणार आहे. गुगल प्ले स्टोअरच्या मदतीने तुमच्या फोनमधील धोकादायक ॲपची माहिती क्षणात मिळेल. गुगलने हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गुगल प्ले स्टोअरच्या कोट्यवधी युजरला त्याचा फायदा होणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही हानिकारक ॲपची माहिती मिळवू शकतात. गुगुल प्ले स्टोअरमध्ये असणारे Play Protect फीचर तुमच्यासाठी महत्वाचे आहे. हे फिचर तुमचा संपूर्ण स्मार्टफोन स्कॅन करेल आणि तुम्हाला लपवलेल्या धोकादायक ॲपबद्दल माहिती देईल. तुमच्या फोनमध्ये कोणतेही धोकादायक ॲप असल्यास, हे फिचर तुम्हाला त्यांची माहिती स्क्रीनवर देईल.
असा वापरा Play Protect फिचर
- सर्वात आधी तुमचा मोबाइलमधून गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
- प्ले स्टोअरमधील तुमच्या प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
- तुम्हाला मेन्यू सेक्शनमध्ये Play Protect ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करा.
- Play Protect वर क्लिक करताच तुमचा मोबाइलची संपूर्ण स्कॅनिंग होईल.
- फोनमध्ये तुम्हाला Scanning successful Progress… असा मेसेज दिसेल.
- स्कॅन झाल्यावर तुमच्या मोबाइलमध्ये कोणताही धोकादायक ॲप नसेल तर No Harmful Apps Found असा संदेश येईल.
- जर तुम्हाला No Harmful Apps Found असा मेसेज आला नाही तर धोकादायक ॲपची माहिती स्क्रीनवर दिली जाईल. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डिलिट करुन मोबाईल सुरक्षित ठेवले.