आलेगाव (Teak smuggling) : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्ला शेतशिवारातील शेताच्या धुर्यावरील दोन सागवानच्या झाडांची कटाई करून अज्ञात व्यक्तीने तस्करी केल्याची घटना मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी (Teak smuggling) शेतकर्याने मंगळवार रोजी पातूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
आलेगाव येथील मो. वासिफ उररहमान या शेतकर्यांचे कार्ला शेतशिवारात शिव टेकडीच्या मागील शेत सर्व्हे नंबर ४३/३ मधील धुर्यावरील दोन सागवानाच्या झाडांची कटाई करून अज्ञात चोरट्यांनी तस्करी केली. तसेच शेतात असलेल्या जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले शेती अवजारेसुद्धा लंपास करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्याचे एकूण ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे (Teak smuggling) शेतकर्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकर्यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीतून केली आहे.