परभणी(Parbhani):- जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील जिंतूर येलदरी रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (Government Technical College) समोर दुचाकीचा अपघातात(Accident) एक जण गंभीर जखमी झाला होता. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना दि. 04 फेब्रुवारी रात्री 08 च्या सुमारास घडली असून अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जवळील घटना
मागील अनेक दिवसांपासून जिंतूर यलदरी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून रस्त्याने वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे नेहमी अपघात घडून अनेकांचे जीव गेले असून बरेच जण अपंग झाले आहेत असाच प्रकार शहरातून दुचाकी क्रमांक MH 26 AV 6617 वरुण एकटाच रस्त्याने जात असताना अपघात झाला. यात दुचाकीवरील नंदुआप्पा मिसाळ वय 40 वर्ष हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला माहिती दिली. यावेळी रुग्णवाहिकेचे (Ambulance) डॉ.अरुण लाहुटी,चालक अन्सारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी डॉ.स्नेहा वाव्हळे, सिस्टर हरकळ, रुग्ण कक्ष सेवक पालवे, राठोड , नागेश आकात आदींच्या मदतीने प्राथमिक उपचार करून अपघातग्रस्तांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर मार असल्याने प्रकृती खालवत चाललेली होती म्हणून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
एखाद्या अनोळखी वाहनाने धडक दिल्याने घटना घडली असण्याची शक्यता
दरम्यान अपघातग्रस्तांचे नाव, गाव, कांहीच ओळख मिळू शकलेली नव्हती. मात्र जिल्हा रुग्णालयात (Hospital)हलविण्यात येत असताना पुणे येथील रहिवासी असल्याचे समजले दरम्यान जिंतूर येलदरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे किंवा एखाद्या अनोळखी वाहनाने धडक दिल्याने घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी बातमी लिहिपर्यंत पोलीसात नोंद झालेली नव्हती.