देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा : चिखली तालुक्यातील मनुबाई येथे अचानक ईव्हीएम मशीन बंद पडली. मात्र दिड तास उलटूनही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारामध्ये गोंधळ होवून यापाठीमागे काय प्रकार असेल असा संभ्रम निर्माण झाला आहे.
चिखली व सि राजा विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) आज सकाळ पासून गावा गावात मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र त्यातच मनुबाई येथे अचानक 3 वाजेच्या दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडली आणि दिड तासाचा कालावधी आटोपूनही मशीन डूरुस्ती केली नव्हती. त्यामुळे मतदारांचा खोळंबा होवून या मागे काय प्रकार आहे, असे चित्र निर्माण झाल्याने मतदार सभ्रमात पडले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनुबाई येथे 850 मतदार आहेत. आज (Assembly Elections 2024) मतदान असल्याने मतदारांनी मतदान केंद्रा वर रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया सुरु होती. मात्र अचानक दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी ईव्हीएम मशीन बंद पडली आणि मतदारांचा खोळंबा झाला. सतत मतदार दिड तास रांगेत उभे राहिले परंतु बूथ वरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बराच वेळ वरिष्ठाना माहिती कळविली नाही.
त्यामुळे मतदारांनी गोंधळ सुरु केला आणि पत्रकार यांना बोलावले. तेव्हा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी लगेच कार्यवाही सुरु केली. त्यामुळे कर्मचाऱ्याची चांगलीच धावपळ उडाली.आणि दिड तासा नंतर नव्याने ईव्हीएम मशीन अधिकाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळे मतदानाला दिड तास विलंब झाल्याने हा प्रकार का घडवीला. या पाठीमागे काय प्रकार असू शकतो अशा सभ्रम मुळे मतदार गोंधळात पडला आहे. यावेळी मनुबाई गावातील वयोवृद्ध महिला पुरुष, तरुणाई यांना मतदाना पासून थाबविण्यात आले होते.