मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Assembly Winter Sessions) : विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला असून मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदाचा तिढा येत्या दिवसात सुटणार आहे. दरवर्षी प्रमाणे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यात या (Assembly Winter Sessions) अधिवेशनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात लिपिक-टंकलेखकाची 10 पदे आणि शिपाई/संदेश वाहक यांची 24 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
नागपूर करारानूसार राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन उपराजधानीत घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार यंदा नुकत्याच विधानसभा निवडणुकीला निकाल जाहीर झाला असून आता सरकार स्थापनेची वाट आहे. सदस्यांच्या शपथविधीनंतर (Assembly Winter Sessions) हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. बुधवारी प्रशासनाच्या दिवसभर बैठका सुरू होत्या.