AUS vs IND : दुसऱ्या कसोटीसाठी टीम जाहीर, अनकॅप्ड प्लेअरची निवड, आणखी कुणाला संधी?

1 hour ago 2

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीसाठी जोरदार सराव करत आहेत. टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवरील पकड आणखी मजबूत करण्याच्या तयारीने उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. दुसरा सामना हा डे नाईट असणार आहे. हा सामना एडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी 8 दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी 14 खेळाडूंची निवड

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या 13 खेळाडूंमध्ये आणखी एकाला जोडलं आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी अशाप्रकारे 14 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ऑस्ट्रेलियाने अनकॅप्ड ऑलराउंडर ब्यू वेबस्टर याचा समावेश केला आहे. ब्यू वेबस्टर याचा मिचेल मार्श याच्या जागी कव्हर खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मिचेल मार्श याने पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत 17 ओव्हर बॉलिंग केली होती. त्यामुळे मिचेलला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. अशात मिचेलला ऐनवेळेस दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकावं लागल्यास त्याच्या जागी वेबस्टरचा समावेश केला जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 2 सामने खेळवण्यात आले होते. वेबस्टर या 2 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला होता. वेबस्टरने 145 धावा केल्या होत्या. तसेच 7 विकेट्सही मिळवल्या. अशात आता वेबस्टरला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

A caller summation comes successful arsenic Australia denote a 14-player squad for the 2nd Test against India successful Perth 🤔#AUSvIND | #WTC25https://t.co/ewHB8n9dtW

— ICC (@ICC) November 28, 2024

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article