Autorickshaw Sanghatan: शासनाने कल्याणकारी मंडळाबाबत धोरण स्पष्ट करावे

2 hours ago 1

अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडणार आटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या बैठकीत निर्णय

नांदेड (Autorickshaw Sanghatan) : ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी २९सप्टेंबर रोजी श्रमिक संघ कार्यालय ठाकुरद्वार मुंबई येथे कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Autorickshaw Sanghatan) ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे व त्या मार्फत रिक्षा चालकांसाठी पेन्शन योजना व अन्य विविध सवलती देण्यात याव्यात याकरिता गेले २५ वर्षांपासून स्व.शरद राव साहेब यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे मागणी केली जात होती. त्यानंतर शशांक राव यांनी शासनाला (Govt Welfare Boards) कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले.

त्या पार्श्वभूमीवर कल्याणकारी मंडळी (Govt Welfare Boards) स्थापना करत असताना शासनाने रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधने अपेक्षित असताना कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या मंडळाची रचना केली असल्याने रिक्षा चालकांचा हेतु साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासनाने कल्याणकारी मंडळा बाबत धोरण स्पष्ट करावे,अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार शासन या मंडळासाठी फक्त एकदाच ५० कोटी रुपयांची तरतूद करणार असून रिक्षा चालकांकडुन नोंदणी शुल्क ५००रु व वार्षिक वर्गणी ३००रुपये असे राज्यातील १५ लाख रिक्षा चालकांकडुन कोट्यवधींचा निधी जमा करु पहात आहे. मात्र मंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या सवलती आणि पेन्शन योजनेबाबत कुठे ही स्पष्टता नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने याबाबत रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मंडळा बाबत स्पष्ट धोरण तयार करावेत. तसेच रिक्षा चालकांकडुन ऑनलाईन ( ई चलान) द्वारे ट्राफिक पोलीस व आरटीओ अन्यायकारक अवाजवी दंड वसूल करत असल्याने रिक्षा चालक हैराण झालेले आहेत.

सदरची ऑनलाइन दंड पद्धत बंद करून पुर्वी प्रमाणे एलटीएम द्वारे दंड आकारला जावा अशी भुमिका रिक्षा चालकांची आहे. या दोन्ही मागण्यां बाबत कृती समितीच्या वतीने शासनाकडे दाद मागण्यात येणार आहे. १६ ऑक्टोंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या स्थानिक परिवहन कार्यालया मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर करणार आहेत. या (Autorickshaw Sanghatan) मागण्यांची लवकरात लवकर दखल घेतली जावी अन्यथा कृती समितीच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

रिक्षा चालकांना वयाच्या ६५ वर्षानंतर त्यांच्या उत्पन्नाच्या किमान ३० टक्के रक्कम पेन्शन देण्यात यावी, अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला किमान १० लाख रुपये मदत द्यावी,रिक्षा चालकांच्या कुटुंबासाठी १० लाखाचा आरोग्य विमा देण्यात यावा, मुलांच्या शिक्षणासाठी १० लाख रुपये विना व्याज कर्ज सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासह अन्य मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत.

या (Autorickshaw Sanghatan) बैठकीला समितीचे अध्यक्ष शशांक राव सरचिटणीस,विलास भालेकर, कामगार नेते शंकर साळवी,उपाध्यक्ष भरत नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, सुत्रसंचालन मारुती कोंडे यांनी केले राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या पदाधिकार्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर बैठकीला विजय पाटील,पद्माकर मेहेर, नामदेव जगताप,सिताराम ताम्हाणे,नरेंद्र वाघमारे,जावेद शेख,प्रकाश साखरे, अहेमद (बाबा) बागवाले गंगा सरोदे, शेख तयंब , सय्यद इलियास, महंमद साबेर,पिंटू गजभारे नांदेड यांच्यासह राज्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article