Washim:- मानोरा पोलीस स्टेशन (Police Station)अंतर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलगी प्रकरणातील आरोपी फरार होता. पोलिसांनी फरार आरोपी मनीष उकंडा राठोड (वय २१) यांना पकडून ३० सप्टेंबर ला अटक केली.
२५ सप्टेंबर ला मुलीचा शोध घेऊन मुलीस त्याच्या कुटूंबायाच्या स्वाधीन केले
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार शिवण क्लास करिता घरून गेली. ती मुलगी पुन्हा घरी परत गेली नसल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी २५ सप्टेंबर ला मुलीचा शोध घेऊन मुलीस त्याच्या कुटूंबायाच्या स्वाधीन केले. मात्र आरोपी फरार होता पोलिसांनी आरोपी मनीष उकंडा राठोड (२१) याला अटक करून ग्रामीण रुग्णालयात तपासणी (Inspection) करिता पाठविल्या नंतर आरोपीला ३० सप्टेंबर ला अटक केली आरोपी मनिष उकंडा राठोड यांचे विरुद्ध कलम १३७ (२), ६४(२), (आय ), (एम ), ६९ बी एन एस. सह कलम ४, ८, १२ बाल लैंगिक कायदा (Child Sex Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजमिरे, ए. एस. आय. सुभाष महाजन हे तपास करीत आहे.