श्री महालक्ष्मी मंदिरातील 'सार्वजनिक नवरात्रोत्सव':भाविकांचा पाच कोटींचा काढला विमा

2 hours ago 1
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दिनांक ३ आॅक्टोबर पासून होणार आहे. दिनांक ३ ते १२ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच भाविकांचा पाच कोटींचा विमा काढण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. गुरुवारी (दि.३) सकाळी आठ वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय असणार आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा 'सार्वजनिक नवरात्र उत्सव' महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल. सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, तर रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे. भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा देखील काढण्यात आला आहे. मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article