मानवी साखळीतून हृदयाचे महत्व:नर्सिंगच्या विद्याथीर्नींचा पुढाकार

2 hours ago 1
जागतिक ह्रदय दिनाच्या निमित्ताने मानवी शरीरातील ह्रदयाचे महत्व विद्यार्थीनींना समजावे, या उद्देशाने न-हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग च्या विद्याथीर्नींनी मानवी साखळीतून ह्रदय साकारले. ह्रदयाचे कार्य कशा प्रकारे होते, त्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी, याविषयी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य शितल निकम व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृद् रोहिणी विकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. हृदयविकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे यानिमित्ताने जनजागृती केली जाते. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते. ती माहिती मानवी साखळीतून संस्थेत देण्यात आली. मैत्रेयी उद्योगिनी संस्थेच्या ग्रोसरी सेवा व्यवसायाचे उद्घाटन ब्राह्मण महासंघ संचलित मैत्रेयी महिला उद्योगिनी संस्थेच्या ग्रोसरी सेवा व्यवसायाचे उद्घाटन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाले .सुमेधा ग्रुप च्या अध्यक्ष सुमेधा जाधव,महासंघ च्या विश्वस्त श्वेता कुलकर्णी,तृप्ती तारे, विद्या घटवाई, प्रज्ञा लोणकर आणि सौ.लता दवे उपस्थित होत्या.निरजा जोशी यांनी सूत्र संचालन तर प्रियंका कुलकर्णी यांनी स्वागत केले . मैत्रेयी उद्योगिनी संस्था आणि सुमेधा लाईफ चे 'ओपिक ग्रोसरी ' एकत्र काम करणार असून पुण्यातील २० हजार कुटुंबाना घरपोच किराणा वाटप या माध्यमातून होणार आहे . किराणा सामानाचे बिल हे सामान घरपोच आल्यानंतर दोन महिन्यानंतर ग्राहकाने द्यायचे आहे .त्या साठी महासंघ च्या मैत्रेयी आणि महालक्ष्मी पतसंस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे सुमेधा ग्रुप च्या अध्यक्ष सुमेधा जाधव यांनी याप्रसंगी सांगितले .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article