प्रलंबित मागण्यासाठी धरणग्रस्तांचे रास्ता रोको आंदोलन:नगर-संभाजीनगर मार्गावर आंदोलकांचे बोंबाबोंब

2 hours ago 1
धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी नेवासे, शेवगाव, गंगापूर व पैठण तालुक्यातील धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने संभाजीनगर-नगर सीमेवरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे रास्ता रोको व बोंबाबोंब आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले. धरणग्रस्त असून आमचे प्रकल्प होऊन ५० वर्षांचा कालावधी होऊनही अद्याप आम्हाला शासनाच्या परिपत्रकानुसार सवलती मिळाल्या नाहीत. घर, शेती संपादित झाले. धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळून देखील काही फायदा झाला नाही. भूसंपादनसाठी योग्य कागदपत्राची पुरता करून फाईल पूर्ण केली, तरी अद्याप काही मदत कारवाई नाही. असंख्य शेतकऱ्यांच्या असंपादित शेतात जायकवाडीचे पाणी येते तरी त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनीत मूळ मालकाने ताबा दिला नाही आदी मागण्यासाठी यापूर्वी ही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे व आत्मदहनाचे निवेदन दिले. शासन तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवलेल्या नाहीत. त्यामुळे जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांना निवेदन यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष व आयोजक काकासाहेब भुकेले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष मच्छिन्द्र आर्ले, शेतकरी नेते कल्याणराव गायकवाड, प्रहार संघटनेचे भाऊसाहेब शेळके, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद निरपळ, इसाभाई पठाण, कुंडलिक मिसाळ आदी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नियंत्रणखाली यांचा बंदोबस्त होता. यावेळी गोदावरी नदीत पट्टीचे पोहणारे स्थानिक जीवरक्षक पथक, तराफा, होडी, स्पीडबोट घेऊन तत्पर कार्यरत होते. गंगापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article