Hingoli Accident: भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक; एक ठार दोन जण गंभीर

2 hours ago 1

हिंगोली तालुक्यातील कलगाव शिवारात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली अपघाताची घटना

हिंगोली (Hingoli Accident) : तालुक्यातील कलगाव शिवारात सोमवारी सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली असून दोनजण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील काही मजूर हिंगोली तालुक्यात कामासाठी आले असून आडगाव येथे सोयाबीनचे काम आटोपून काही मजूर ३० सप्टेंबर रोजी ट्रॅक्टरने परभणीकडे निघाले होते. हिंगोली ते वाशिम रस्त्यावर कलगाव शिवारात सकाळी ६ च्या सुमारास भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे ट्रॅक्टरमधील मुन्नी सालकू जांगुतकर (३५) रा.अक्करवाडी (मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला तर राजू विके व सालकू जांगुतकर हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धावून घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यातील राजू विके यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता नांदेड रूग्णालयात हलविण्यात आले. अपघात प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article