NCP Sharad Pawar party: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाची सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे: जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर

1 hour ago 1

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (NCP Sharad Pawar party) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बुलढाणा जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी महत्त्वाची बैठक आज दिनांक 26 9 2024 रोजी राष्ट्रवादी भवन बुलढाणा येथे पार पडली सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या आदेशान्वये जिल्ह्यात सभासद, सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना पदाधिकाऱ्यांना बैठकीमधे देण्यात आल्या.

यावेळी सौ रेखा खेडेकर जिल्हाध्यक्ष, यांनी बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक तालुक्यात पक्षाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यात यावी पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचेच शासन येनारअसून पक्ष फुटी नंतर जो पक्षाच्या सोबत राहिलेला आहे व पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत राहिलेला आहे येणाऱ्या काळात अशा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणती पद किंवा कामे करण्यात येणार नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी सदर बैठकीस  प्रसेनजित पाटील, कार्याध्यक्ष,  नरेश शेळके, कार्याध्यक्ष  साहेबराव सरदार माजी अध्यक्ष,  राजू पाटील भोंगळ , श्री नानाभाऊ कोकरे व वनिताताई गायकवाड पी एम जाधव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस  संतोषरावजी रायपुरे,  संजयजी गाडेकर, प्रदेश पदाधिकारी हे उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये  पी एम जाधव जिल्हा उपाध्यक्ष यांनी असा ठराव मांडला की, जे पदाधिकारी पक्ष फुटी नंतर पक्षातून बाहेर पडले त्यांना परत पक्षात घेऊ नये, सदर ठराव बहुमताने बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला. ओम प्रकाश भुतेकर, यांनी सदर ठरावास अनुमोदन दिले. बैठकीमध्ये जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी, सेलचे सर्व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article