Buldana:- चिखली येथील डॉ नितीनराजे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट)(Nationalist Congress) डॉक्टर सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड मुंबई (Mumbai)येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी श्री शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थित केली आहे. डॉक्टर सेल मध्ये महाराष्ट्र मधील आयुष विभागाची मोठी जिम्मेदारी नितीन पाटील यांना देण्यात आली आहे.
आयुष विभागाची मोठी जिम्मेदारी नितीन पाटील यांना देण्यात आली
काही महिन्यापूर्वी मुंबई येथे डॉ नितीनराजे पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र मधील 253 डॉक्टरानी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. डॉ नितीनराजे पाटील हे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा आहे. आणि देशात त्यांच्या सोबत आयुष चिकित्सकांचा मोठा जन समूह सुद्धा आहे. या निवडीचे श्रेय डॉ नितीन पाटील मा. मंत्री श्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष ऍड नाझीर काझी यांना देतात. या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे