मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सव्वा तास रस्ता रोको:2 किमी वाहनांच्या रांगा, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

2 hours ago 2
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी 22 सप्टेंबर रोजी जिजाऊ चौकात सव्वा तास रास्ता रोको केला. यावेळी दोन किमी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या रांगा वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेत रस्ता रोको आंदोलन थांबवले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा एक वर्षापासून लढा सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीची आरक्षण द्यावे सगे सोयरे कायदा पारित करा, अशा मागणीसाठी जरांगे आग्रही आहेत. जरांगे यांनी राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत दिली होती. परंतु सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ चौक सव्वा तास सकल मराठा समाजाच्या वतीने बंद करण्यात आला होता. यावेळी सुरेश वाकडे, सुनील कोटकर, सतीश वेताळ सह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले असून आज त्यांचा सहावा दिवस आहे. राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. यासोबतच पुण्यातही बंदची हाक देण्यात आली आहे. एकीकडे मराठा समाज पेटलेला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे देखील आमरण उपोषण सुरू झाले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सकाळी जालन्याचा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी केली दोघांचाही बीपी सध्या तरी स्टेबल आहे. मात्र दोघांनीही आता उपचार घेण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आरोग्य प्रशासनाकडून तशी उपचार घेण्यासाठी विनवणी देखील करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article