AFG vs SA 3rd Odi: अफगाणिस्तान इतिहास रचण्यासाठी सज्ज, तिसरा सामना कुठे?

2 hours ago 2

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रविवारी 22 सप्टेंबर रोजी तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानने ही मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचं आता विजयी हॅटट्रिककडे लक्ष आहे. अफगाणिस्तानने 144 चेंडू राखून आणि 6 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 177 धावांनी विजय मिळवला होता. अफगाणिस्तानने यासह मालिका जिंकली. आता तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. आपण या तिसऱ्या सामन्याबाबत जाणून घेऊयात.

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना कधी?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना रविवारी 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजता टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही. तर मोबाईलवर हा सामना फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.

वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीम: हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), इकराम अलीखिल (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, रियाझ हसन, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर, फझलहक फारुकी, गुलबदीन नायब, दरविश रसूली, नावीद अहमद, फरेद अहमद मलिक, अब्दुल मलिक आणि बिलाल सामी.

वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेची टीम: टेम्बा बावुमा (कर्णधार), काइल व्हेरेन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, विआन मुल्डर, ब्योर्न फोर्टुइन, नकाबा पीटर, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, लिझाद विल्यम्स, जेसन स्मिथ, अँडिले फेहलुकवायो, ओटनील बार्टमन आणि अँडिले सिमेलेन.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article