Buldhana: काँग्रेसची बुलढाणा जिल्हा विधानसभा आढावा बैठक उत्साहात..

2 hours ago 1

चिखली (Buldhana):- केंद्र – राज्यात भाजप (BJP)व त्यांच्या मित्रपक्षांच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली असून भाजपची हुकुमशाही मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. सोयाबीन – कापसाला भाव नाही, शेतकरी आपल्या मालाची निर्यात करु शकत नाही. दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे सरकार फक्त टेंडर काढून भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात तळागळातील माणसांनी व्रजमुठ दाखवत लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections) महाराष्ट्रात मविआला साथ दिली. राज्यातील जनतेचा पुन्हा काँग्रेसच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास आगामी विधानसभा निवडणूकीच्या विजयाकडे घेऊन जाणारा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे (Congress)बुलढाणा जिल्ह्याचे विधानसभा निरीक्षक मध्यप्रदेश विधानसभा सदस्य, मुरैनाचे आमदार दिनेश गुर्जर यांनी केले.

तळागळातील माणसांचा काँग्रेसवरील विश्वास विजयकाडे घेऊन जाणारा : दिनेश गुर्जर

आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रविवार २९ सप्टेंबर रोजी चिखली येथे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या (College of Engineering) सभागृहामध्ये बुलढाणा जिल्हा विधानसभा आढावा बैठक आमदार दिनेशजी गुजर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विभागीय समन्वयक आमदार धीरज लिंगाडे, जिल्हा समन्वयक अविनाश उमरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी दिनेश गुर्जर बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांकडून निरीक्षक दिनेश गुजर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी संपूर्ण बुथ कमिटीचा आढावा निरीक्षक गुर्जर यांना दिला. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या रणनीती आणि योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.

आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या रणनीती आणि योजना यावर सखोल चर्चा

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व एकात्मिक विकास साधण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम करण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ करण्यात आला. या बैठकीत स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. तुमचे सहकार्य आणि पाठिंबा काँग्रेस पक्षाचे विजयाचे बळ असल्याचेही दिनेश गुर्जर यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धनजी सपकाळ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड,विजय अंभोरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, तसेच प्रदेश सचिव दादूसेठ,सौ.स्वातीताई वाकेकर, जयश्रीताई शेळके,धनंजय देशमुख,ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, प्रा.संतोष आंबेकर,मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष नेते ॲड.अनंतराव वानखेडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कलीम खान, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी माजी नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षीय भाषण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन इरफान पठाण यांनी केले.

काँग्रेसमध्ये होत असलेल्या इनकमिंगचा आलेख चढताच : राहुल भाऊ बोंद्रे

बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात गत काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असून काँग्रेसच्या विचारधारेला अंगीकारणाऱ्यांची संख्या वाढत आहे . काँग्रेसच्या लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून लोक भाजपची फोडा आणि राज्य करा ही निती आणून पाडत असल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केले. जिल्हा काँग्रेसने महायुती सरकारच्या आमदारांच्या विरोधात भय आणि भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघाचा नारा दिला आहे. काँग्रेसच्या या भय आणि भ्रष्टाचारमुक्तच्या अभियनाला जनेतचा उत्सर्फूत प्रतिसाद मिळत असून जिल्हाभरातून काँग्रेसमध्ये होत असलेल्या इनकमिंगचा आलेख चढताच असल्याचेही राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

१६-१७ ऑक्टोंबरला गुर्जर यांचा विधासभानिहाय दौरा

आगामी विधानसभेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने रणणिती आखाला सुरवात केली असून राज्यभरात काँग्रेसच्या बैठका आणि मतदारसंघनिहाय दौऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे. काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा विधानसभा निरीक्षक दिनेश गुर्जर हे १६-१७ ऑक्टोंबरला जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघाचे दौरे करणार आहे. यामध्ये ते स्थानिक नेत्यांच्या सर्व अडीअडचणी समजून घेण्यासह बुथ कमिटीचा सविस्तर आढावा घेणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article