पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळ यांचं अभिनंदन केलं. तर शिवराज राक्षे याची पाठराखण करत त्याने पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी 2025 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामना रंगला. हा अंतिम सामना पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्या झाला. तर या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. दरम्यान, महेंद्र गायकवाड याने सामना संपायला काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. तर शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करत शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशातच डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी यावर भाष्य करत शिवराजच्या भूमिकेचं समर्थन केलंय. “पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे. कारण एवढ्या कमी वयात महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं मोठी गोष्ट आहे, तो महाराष्ट्र केसरी झालाय. त्यासाठी मी त्याचं काल आणि सोशल मीडियावरुन अभिनंदन केलंय.”, असं चंद्रहार पाटील म्हणाले. दरम्यान, कालच्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात घडलेल्या प्रकारावर ही त्यांनी भाष्य केले आहे. “शिवराजसोबत झालेला प्रकार हा 100 टक्के चुकीचा आहे. ही 100 टक्के चुकी कुस्तीगीर संघांची किंवा कुणा एका व्यक्तीची नाही. चुकी ही शिट्टी वाजवणाऱ्या पंचाची आहे. शिवराज राक्षे याने स्वत:ने पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे”, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलं.
Published on: Feb 03, 2025 02:33 PM