नुकताच देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य आणि नोकदारवर्गाला मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाकं वाजतांना दिसते. यावरूनच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्प समजायला ७२ तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला आणि आम्हाला समजलं असं कुणी म्हणत असेल तर ते मुर्ख आहेत, असं संजय राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत असंही म्हणाले, आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लवकर अर्थसंकल्प कळला. अर्थसंकल्पाचे भाषण सुरू असताना मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते. त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा सवाल करत संजय राऊत यांनी मोदींनाच खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘संजय राजाराम राऊत यांना टीकेशिवाय जमत नाही, पंतप्रधान हा त्यांचा विषय नाही त्यांनी त्यावर बोलूच नये.’, असे नारायण राणे म्हणाले.
Published on: Feb 03, 2025 05:17 PM