सीएफएसएलकडून सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराचा फॉरेन्सिक अहवाल मागवला'(file photo)
Published on
:
03 Feb 2025, 2:28 pm
Updated on
:
03 Feb 2025, 2:28 pm
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडून मैतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधणाऱ्या काही ऑडिओ रेकॉर्डिंगच्या सत्यतेबद्दल अहवाल मागितला. ६ आठवड्यांमध्ये सदर अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, प्रथम एफएसएल अहवाल पाहू आणि नंतर कुकी ऑर्गनायझेशन फॉर ह्यूमन राईट्स ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेवर पुढे जाऊ. सीएफएसएल अहवाल सीलबंदपणे सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी ऑडिओ रेकॉर्डिंगचे प्रत सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवर ठेवली. लीक ऑडिओ क्लिपमध्ये हिंसा भडकावल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. यासंबंधी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.