सुदैवाने अनर्थ टळला, पाच बालकांना अन्यत्र हलविले
अमरावती (Hope Hospital Fire) : स्थानिक राजकमल ते राजापेठ मार्गावर मुधाेळकर पेठ येथील हाेप चिल्ड्रेन हाॅस्पीटलच्या ऑपरेशन थिएटर मधील वातानुकूलित यंत्रणेला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र अग्निशन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत धाव घेत आग आटाेक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या ठिकाणी भरती असलेल्या पाच बालकांना अन्य (Hope Hospital Fire) रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. साेमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
या (Hope Hospital Fire) प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक मुधाेळकर पेठ येथे हाेप चिल्ड्रेन हाॅस्पीटल आहे. या ठिकाणी अगदी एका दिवसांच्या बाळापासून ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे उपचार केले जातात. अतिदक्षता विभागासह सुसज्ज असलेले हे रुग्णालय लहान मुलांच्या उपचारासाठी प्रसिध्द आहेत. साेमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या रुग्णालयात एका बालकावर (Hope Hospital Fire) ऑपरेशन थिऐटर मध्ये शस्त्रक्रीया सुरु असतांना तेथील वातानुकूलित यंत्रणेमधून धुर निघत असल्याचे ऑपरेशन थिऐटर मधील डाॅक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती तत्काळ अग्निशमन यंत्रणेला व राजापेठ पाेलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात असलेल्या आग विझविणाऱ्या सिलेंडरच्या सहाय्याने ही आग आटाेक्यात आणली.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान या (Hope Hospital Fire) आगेमुळे रुग्णालयात धुरच धुर झाल्याने लहान बालकांना त्रास हाेवू नये या करीता वरील मजल्यावर भरती असलेल्या 5 बालकांना (Hope Hospital Fire) अन्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे मुख्य केंद्रातील वाहन चालक नितीन इंगाेले, फायरमन विक्की हिवराळे, राजेश गजभिये, चंद्रशेखर सुर्यवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण, सागर टपके, राेशन आलाेडे, अमाेल साळूंके यासह प्रशांत नगर उपशाखेचे वाहन चालक राजू शेंडे, ायरमन चंद्रकांत सुर्यवंशी व विशाल शिरभाते यांनी घटनेचे गांर्भिय लक्षात घेता आपली चाेख भूमिका बजावली. यावेळी घटनास्थळावर राजापेठ पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक तसेच कर्मचारी सुध्दा हजर हाेते.