मोटार सायकल स्वार गंभीर जखमी
कळमनुरी (Motorcycle Accident ) : शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण मांडवगडे हे शेतातून घरी परत येत असताना कळमनुरी जवळील बायपासवर एका मोटरसायकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.
येथील व्यापारी तथा शेतकरी प्रवीण काशीसा मांडवगडे (वय६५ ) आपल्या शेतातून घरी येत होते. ते बायपास वरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकलने त्यांना जोराची धडक दिली. या (Motorcycle Accident) धडकेत ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात मोटरसायकल स्वारही गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
मयत प्रवीण मांडवगडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी येथील जैन समाजाच्या स्मशानभूमीत प्रवीण मांडवगडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रवीण मांडवगडे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभाचे असल्याने त्यांच्या या (Motorcycle Accident) अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.