चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमकाा 19 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जाणार असून टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तानची लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांमधील चाहते आतुर झाले आहेत. याच दरम्यान हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिकीटांच्या विक्रीला 28 जानेवारी पासून सुरुवात केली आहे. परंतु टीम इंडियाच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली नव्हती. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाच्या सामन्यांची तिकीट विक्री सोमवार (3 फेब्रुवारी 2025) पासून सुरू झाली आहे. टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांना 125 दिरहम म्हणजचे हिंदुस्थानी 3 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. टीम इंडियाचे सामने दुबईमध्ये जाऊन पाहण्यासाठी https://www.iccchampionstrophy.com/tickets या ICC च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुबईमध्ये खेळवा जाणार आहे. तसेच दुसरा सामना 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि चौथा सामना 2 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जातील.