कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार
कामठी (Chandrasekhar Bawankule) : भाजपा-महायुती सरकारचे (BJP-Mahayuti Govt) ध्येय जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, गरीब, मागास आणि युवकांचे भविष्य चांगले करण्याचे आहे. कमळ चिन्हावर दिलेले एक मत हे महाराष्ट्राचे आणि कामठी मतदार संघाचे भविष्य बदलविण्यासाठी असेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दिवाळीत लक्ष्मीपूजन केल्यावर जशी घरात समृद्धी येते, तसेच (BJP-Mahayuti Govt) भाजप सरकार सत्तेत आल्यावर विकासाची महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी पोचणार आहे, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शनिवारी (दि. १६ नोव्हें) कामठी- मौदा विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण आणि कामठी तालुक्यातील विविध गावांत प्रचार केला. सर्वसामान्य मतदारांच्या भेटी तसेच लघु बैठकांतून मार्गदर्शन केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री बावनकुळे यांच्या या दौऱ्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच मतदारसंघात विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ते म्हणाले, ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून दिल्यास, प्रत्येक गावात ‘परमात्मा एक सेवक समाज भवन’ बांधण्याची योजना आखली आहे. याशिवाय, प्रत्येक गावातील पांदन रस्त्यांचे डांबरीकरण करून गावाचे स्वरूप बदलण्याचा निर्धार केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या 58 योजना प्रभावीपणे राबवून गावागावांत विकास घडवणार असल्याचे सांगून श्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीजपुरवठा, लाडकी बहीण योजनेतून वर्षाला २५ हजार २०० रुपये तर निराधारांचे मासिक पेंशन तीन हजार रुपये होणार असल्याचे सांगितले. कॉंग्रेस केवळ आश्वासन देऊ शकते त्याशिवाय काहीच करू शकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
दौऱ्यात भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान, रमेश चिकटे, जि.प. सदस्य सुभाष गुजरकर, पं.स. सदस्य शुभांगी गायधने, पुष्पा गायधने, राजकुमार वंजारी, नितीन शेळके, दिलीप चापेकर, माधुरी कांबळे, गीता पराते, विशाल शिमले, वनिता उरकुडकर, एजाज खानीवाला, नरेंद्र नांदुरकर, बाबा बोकडे, भोजराज घोरमारे, पुष्पा पांडे, परिहार, रुपेंद्र भस्मे, सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच देविदास वंजारी, सूरज ठाकरे, सीमा वंजारी, गौतमी पाटील, लक्ष्मण वंजारी, कवडू वाडीभस्मे, भारत वंजारी, अरुण वंजारी, शामराव वंजारी, सीताराम वंजारी, सुरेश पाटील, काशिनाथ ठोंबरे, दिलीप सावरकर, रवी सोनवणे, वसंत सावरकर, कविता वंजारी, मोक्षी वाडीभस्मे, रुपाली वंजारी, रीता वंजारी, दीक्षा पाटील, शेखर पाटील, पंकज पाटील, खुशाल येवले, सचिन डांगे, अंकुश ठाकरे, वासुदेव चौधरी, विनोद चौधरी, प्रमोद डांगे, मनोहर भोयर, बंडू चापले, अशोक भोयर, निरंजन गेडेकार, उत्तम जूनघरे, अरुण मेश्राम, प्रकाश देवतळे, अक्षय चौधरी, दीपक खुरपडी, दिलीप खुरपडी, शुभाष खुरपडी आदींची उपस्थिती होती.