Published on
:
05 Feb 2025, 9:27 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:27 am
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - शिवभोजन थाळी योजना पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी. जेणेकरुन गरीब आणि गरजू नागरिकांना वेळेवर अन्न मिळेल. शिवभोजन थाळी सुरु राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे भुजबळांनी या पत्रात लिहिले आहे. शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला असून शिवभोजनच्या दररोज दोन लक्ष थाळीसाठी वार्षिक 267 कोटी रुपये खर्च येतो.