केजरीवाल 3182 मतांनी पराभूत तर प्रवेश वर्मा विजयी..!
दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election Results 2025) : अरविंद केजरीवाल जेव्हा आपकडून (Aam Aadmi Party) निवडणूक लढवत होते, तेव्हा भाजपने (BJP) प्रवेश वर्मा यांना त्यांच्या विरोधात उभे केले होते, तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती. 13व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अरविंद केजरीवाल यांचा 3182 मतांनी पराभव झाला आहे.
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा येथून निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी निवडणुकीत केजरीवाल यांचा पराभव केला आहे. प्रवेश वर्मा (Pravesh Verma) हे माजी मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित तिसऱ्या क्रमांकावर होते. संदीप दीक्षित (Sandeep Dixit) हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.