Published on
:
08 Feb 2025, 12:33 pm
Updated on
:
08 Feb 2025, 12:33 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला यामध्ये ‘आप’ची गेल्या दहा वर्षाची सत्ता उलथवत भाजपाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ४८ जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवत दिल्ली ताब्यात घेतली आहे. १९९३ नंतर २७ वर्षांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. आता या निकालावरुन हे स्पष्ट झाले आहे की देशभरातील १९ राज्यांमध्ये भाजप व एनडीए (National Democratic Alliance)सरकारे सत्तेत आहेत. आणि दैनिक भास्कर ने याबाबत वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यश
२०२४ मध्ये तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आतापर्यंत ८ राज्यांमध्ये निवडणूका लढल्या आहे. यामध्ये आंध्रपद्रेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिसा, जम्मू- काश्मिर, हरियाणा, महाराष्ट्र व झाारखंड या राज्यांचा समावेश आहे. यामध्ये ५ राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात एनडीएला यश आले. आता दिल्लीमधील विजयानंतर ही संख्या ६ झाली आहे. तर झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी व जम्मू काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व सिक्कीममध्ये एसकेएम आघाडीला यश मिळाले.
यामधील ५ राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा, हरियाणा व महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार निवडूण आले. या सर्व राज्यांमध्ये यंदा भाजपाने यश मिळवले आहे. आता दिल्लीमध्ये भाजपाने पूर्ण बहूमत मिळवल्याने देशभरातील एकूण १९ राज्यांमध्ये भाजपप्रणीत सरकारे आहेत.
या राज्यांमध्ये आहेत भाजपा व एनडीएची सत्ता
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिजोरम, त्रिपूरा, या राज्यांमध्ये भाजपाची पूर्ण सत्ता आहे. तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा, बिहार, नागालँड, मेघालय या राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे.
२०१८ मध्ये एनडीएची होती २१ राज्यांमध्ये सत्ता
२०१८ साली भाजप व एनडीएची २१ राज्यांमध्ये सत्ता होती. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या रकॉर्डची बरोबरी केली होती. इंदिरा गांधी ज्यावेळी पंपप्रधान होत्या त्यावेळीही देशातील २१ राज्यामध्ये काँग्रेस व काँग्रेस आघाडीची सराकारे होती. भाजपनेही भारतातील २८ महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता हस्तगत केली आहे.