तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. फक्त जरा थांबा थोडी घाई करू नका. कारण, आता लवकरच एक कार बाजारात येत आहे. ही Electric Car भारतात लाँच होणार आहे. ही कार नेमकी कोणत्या कंपनीची आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
व्हिएतनामची टाटा कंपनी विनफास्ट लवकरच आपली Electric Car भारतात लाँच करणार आहे. या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाणार असून, त्यासाठी कंपनीने तामिळनाडूमध्ये आपला प्लांट उभारला आहे. गेल्या वर्षी तामिळनाडूत आलेल्या पुरानंतरही विनफास्टने आपला प्रकल्प वेगाने सुरू करण्याचे काम केले आहे.
विनफास्ट सर्वात आधी आपली VF7 एसयूव्ही भारतात लाँच करणार आहे, जी कंपनी या वर्षी सणासुदीच्या हंगामात सादर करू शकते. यापूर्वी विनफास्टने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपल्या वाहनांचे प्रदर्शन केले होते. विनफास्टच्या इलेक्ट्रिक कारचे खूप कौतुक झाले असले तरी विनफास्ट कार तेव्हापासून भारतात लाँच होण्याची वाट पाहत आहेत
सर्व वाहने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लाँच होणार?
विनफास्ट आपली कार भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. तसेच, इलेक्ट्रिक कारची किंमत कमी करता यावी, यासाठी कंपनीने आपल्या प्लांटमध्ये बॅटरी तयार करण्याची योजना आखली आहे. विनफास्ट भारतात लाँच होणाऱ्या ईव्हीमध्ये VF7 SUV, VF6, VF3, VF8 आणि VF9 चा समावेश असेल.
सर्वात परवडणारी EV VF3 असेल
विनफास्ट भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार VF3 लाँच करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा नॅनोसारख्या इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये VF3 ची किंमत सर्वात कमी असू शकते. VF3 बद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक कारला 2 दरवाजे असतील आणि ही 2 सीटर असेल.
VF3 रेंज आणि फीचर्स
विनफास्टच्या सर्वात लहान इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचे झाले तर ही 2 सीटर असेल. मीडिया रिपोर्टनुसार, ही कार 215 किलोमीटरपर्यंत रेंज देईल. VF3 इलेक्ट्रिक कार 0 ते 100 चा वेग पकडण्यासाठी फक्त 5.5 सेकंद घेईल. या इलेक्ट्रिक कारमध्ये एबीएस आणि ईबीडी फीचर्ससह रियर साइड पार्किंग सेन्सर्स देखील मिळतील. त्याच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर VF3 MG Coment EV ला टक्कर देईल.
आम्ही तुम्हाला वर सविस्तर माहिती दिली आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार कार लॉन्च झाल्यावर घेऊ शकतात.