राजधानी नवी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले असून आपला पराभवाचा दणका बसला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. यामुळे दिल्लीत भाजपचे कमळ फुलले असून भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर भाजपने मोठा जल्लोष केला. दिल्लीत भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचाही उल्लेख केला.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं सरकार आलं आहे. यमुनेला दिल्लीची ओळख करणार. आम्ही संकल्प केला आहे. हे काम कठिण आहे. दीर्घ काळापासूनचं आहे. कितीही वेळ गेला, शक्ती कितीही लागली तरी संकल्प मजबूत असेल तर आपण यमुना स्वच्छ करू.
मी अण्णा हजारे यांचं विधान ऐकत होतो. अण्णा हजारे हे बऱ्याच काळापासून आपदावाल्याची पिडी झेलत होते. त्यांनाही या पिडेतून मुक्ती मिळाली असले. ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला. तेच भ्रष्टाचारात बुडाले. या पक्षाचे मंत्री, मुख्यमंत्री भ्रष्टाचारात तुरुंगात गेले. स्वतला इमानदारीचं प्रमाणपत्र द्यायचे. आणि दुसऱ्यांना भ्रष्टाचारी ठरवायचे. तेच भ्रष्टाचारी निघाले. दारू घोटाळ्याने दिल्लीला बदनाम केलं. अहंकार एवढा, लोक कोरोनाने होरपळली होती, तेव्हा आपदावाले शीशमहल बनवत होते. त्यांनी आपला प्रत्येक घोटाळा लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले. आता दिल्लीचा जनादेश आला आहे. पहिल्या विधानसभा अधिवेशनात सीएजीचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराची चौकशी होईल. ज्याने लुटलं असेल त्याला भरावं लागेल. ही पण मोदींची गॅरंटी आहे