आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई - सावंतवाडी दरम्यान २ अतिरिक्त विशेष गाड्या सुटणार आहेत.File Photo
Published on
:
08 Feb 2025, 12:34 pm
Updated on
:
08 Feb 2025, 12:34 pm
रोहे, पुढारी वृत्तसेवा: आंगणेवाडी जत्रेदरम्यान (Anganewadi jatra) प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान २ अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या आधी मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता एकूण ६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान २ अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड विशेष (२) ट्रेन क्रमांक 01134 विशेष ट्रेन दि. 23 फेब्रुवारी रोजी 18.00 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01133 विशेष ट्रेन दि. 24 फेब्रुवारीरोजी सकाळी 8.20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी संध्याकाळी 7.०० वाजता पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. हे थांबे देण्यात आले आहेत.
या गाडीचे आरक्षण ट्रेन क्रमांक 01133 चे बुकिंग विशेष शुल्कासह दि. 11 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे.