तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे चे आव्हान
रिसोड (Farmer ID) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचविता यावा, याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांचे (Farmer ID) फार्मर आयडी तयार करण्यासाठी यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देश तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) यांनी दिले.
रिसोड राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, (Farmer ID) किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी करत प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे.शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी हा स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन मोडव्दारे तयार करण्याची ऑनलाईन सुविधा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या संकेतस्थळावरुन शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी रिसोड तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी अॅग्रीस्टॅक या योजनेचा लाभ घेवुन आपले फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करुन घ्यावेत असे आवाहन प्रतिक्षा तेजनकर, तहसिलदार (Tehsildar Pratiksha Tejankar) रिसोड यांनी केले आहे.
महिना अखेरीस ५० टक्के नोंदणी होईल
या (Farmer ID) नोंदणीसाठी यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक गावात होणाऱ्या शिबिराचे तारखेनिहाय नियोजन करावे. प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीएससी सेंटरला नोंदणी करावी. कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी मेळाव्याला भेट द्यावी. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ५० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे अशा सूचना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) यांनी दिल्या आहेत.