वसमत (Gurupadeshwar Shivacharya Maharaj) : वसमत विधानसभा मतदारसंघात जन सुराज्य शक्ती पार्टीचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर मंगळवारी रात्री गिरगाव फाट्याजवळ अज्ञात इसमांनी दगडफेक करून हल्ला केल्याची घटना घडली त्यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यात ते जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांचा जमाव जमा झाला होता देशपांडे पेट्रोल पंपाजवळ जमाव जमवून जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बंद दुकानावर दगडफेक केल्याच्या कारणावरून व पोलिसांशी हुज्जत घातल्याच्या कारणावरून १२५ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पार्टीचे उमेदवार ग्रुप आदेश वर शिवाचार्य महाराज (Gurupadeshwar Shivacharya Maharaj) हे त्यांच्या गाडीने मंगळवारी रात्री गिरगाव कडे जात असताना पळसगाव शिवारात अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला केला त्यात ते जखमी झाले. त्यांना वसमतच्या इस्पितळात दाखल करण्यात आले येथे प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे रवाना करण्यात आले होते तेथे उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. हल्ला घडल्याचे समजल्यानंतर समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने वसमत येथे जमा झाले होते देशपांडे पेट्रोल पंप जवळ जमाव झाला होता.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दिली यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे बेकायदेशीर जमाव जमा करणे दहशत निर्माण करणे रहदारीस अडथळा निर्माण करणे पोलिसांशी हुजत घालून धक्काबुक्की करणे याप्रकरणी १२५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने काही वेळ तणावाचे वातावरण होते पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला व परिस्थिती आटोक्यात आणली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही व बुधवारी मतदान सुरळीत पार पडले या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा कसोशीने करत आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी होत आहे.
सरकार पक्षातर्फे गुन्हा दाखल
गुरू पादेश्वर महाराजांच्या (Gurupadeshwar Shivacharya Maharaj) वाहनावर दगडफेक केल्या प्रकरणी त्यांनी फिर्याद दिली नसल्याने या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी २० नोव्हेंबरला फिर्यादी दिली. ज्यामध्ये गिरगाव पाटीपासुन काही अंतरावर दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवर येऊन साक्षिदाराच्या वाहनावर दगडफेक करून त्यांना दुखापत व वाहनाचे नुकसान केल्याने दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुपडे हे करीत आहेत.
महाराजांवर (Gurupadeshwar Shivacharya Maharaj) हल्ला कसा झाला कुणी केला याचा शोध लावण्याची मागणी होत आहे त्यामुळे या प्रकरणाचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे मोबाईल कॉल लोकेशन डंपडाटा यावरून हल्ला कोणी केला यात कोण सहभागी आहे हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे दहशत निर्माण करण्याची ही घटना आहे त्यामुळे या प्रकाराचा तपास लावून आरोपीवर अटक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे आता पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी या घटनेचा कसा तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या ठिकाणी दगडफेक झाली. त्या ठिकाणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी केंद्रे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.