हिंगोली (Hingoli Accident) : शहरा नजीक नर्सी नामदेव रोडवर शनिवारी झालेल्या स्कुटी व कारच्या अपघातात व्यापारी रितेश अग्रवाल (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीतील औषध विक्रेता रितेश अग्रवाल हे नर्सी नामदेव येथे हिंगोलीकडे येत होते. यावेळी एमएच २०/ सीएच २६२६ क्रमांकाच्या फोर्ड कारशी त्यांची धडक झाली. या (Hingoli Accident) धडकेत रितेश अग्रवाल यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींंनी सांगितले.
हिंगोली शहरातील डॉ. बोथीकर यांच्या रुग्णालया जवळ मेडीकल शॉप चालविणारे रितेश अग्रवाल हे मुळचे सेनगाव येथील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील असे कुटूंब आहे. त्यांच्या (Hingoli Accident) मृत्यूमुळे व्यापारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.