Hingoli Murder Case: गर्भवती पत्नीचा खून करणार्‍या पत्नीला जन्मठेप

2 hours ago 1

जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एन. माने-गाडेकर यांनी सुनावला निकाल

हिंगोली (Hingoli Murder Case) : सेनगाव तालुक्यातील सवना तांडा येथे ऊस तोडीची उचल फेडण्यासाठी माहेराहून १० हजार रूपये घेऊन येण्याच्या कारणातून गर्भवती पत्नीला मारहाण करून खून केला होता. या (Hingoli Murder Case) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एन. माने-गाडेकर यांनी आरोपीला जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.एन. एस. मुटकुळे यांनी दिलेली माहिती अशी की, सवना तांडा येथे अर्चना कचरू उर्फ रंगनाथ दिपके हिस सासरच्यानी ऊस तोडीची उचल फेडण्याकरीता माहेराहून १० हजार रूपयाची मागणी करीत होते. २२ ऑक्टोंबर २०१५ रोजी अर्चना ही सात महिन्याची गर्भवती (Hingoli Murder Case) असताना तिला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी सखुबाई धवसे यांनी २३ ऑक्टोंबरला गोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कचरू उर्फ रंगनाथ दिपके, विठ्ठल कचरू दिपके, अरूणाबाई विठ्ठल दिपके, सुमित्राबाई लक्ष्मण धबाले, आनंदा भालेराव, गौतम बनसोडे रा.सवना तांडा या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिसांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ९ ऑक्टोंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश सी.एल.माने-गाडेकर यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकूण कचरू उर्फ रंगनाथ विठ्ठल दिपके याला जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित पाच जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या (Hingoli Murder Case) प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड.एस.डी.कुटे, अ‍ॅड.एस. एस.देशमुख यांनी सहकार्य केले. जमादार पी.ए.मार्कड यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article