मी विमानतळाचा सुपरवायझर म्हणून काम करणार:नितीन गडकरींच्या इशाऱ्यामुळे अधिकारी टेंशनमध्ये!

2 hours ago 1
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कधी कधी विनोदाने ते आपल्याच पक्षाला चिमटे काढतात. लाडकी बहिण योजनेवर बिधधास्त मत व्यक्त करून त्यांनी आपल्याच सरकारला अडचडणीत आणले आहे. "ती त्यांची बोलण्याची स्टाईल आहे', असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीची बाजू सावरावी लागली. अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावण्यात गडकरी मागेपुढे पाहात नाही. बुधवारी त्यांनी नागपूर विस्तारित विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्यावेळी मी रोज कामावर सुपरवायजरसारखा लक्ष ठेवणार असल्याचे सांगितल्याने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकार तसेच विकासक चांगलेच टेंशनमध्ये आले आहे. मी विमानतळाचा सुपरवायझर म्हणून काम करणार आहे. कामचलावू काम तोडायला लावणार आहे. अलिकडे मी किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले, किती लोकांना सस्पेंड केले आणि किती लोकांना मँडेटरी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली याचा दर आठवड्यात आढावा घेतो असे गडकरी म्हणाले. नागपूर विमानतळाला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. विकासासाठी राज्य शासनाने टेंडर काढले होते. मात्र त्यास कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे साडेतीन वर्षांपासून काम रखडले होते. आता सुप्रिम कोर्टाने निकाल दिल्यानंतर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑन लाईन कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा हवाला देऊन गडकरी यांनी आपल्या भाषणात धडाकेबाज बॅटिंग केली. मी रोज विमानतळाच्या प्रत्येक कामार सुपरवायजरसाखा लक्ष देणार आहे. जे काम चांगल होणार नाही ते तोडायला लावेल. गरज भासल्याने सस्पेंड आणि ब्लॅक लिस्ट करण्याचा इशाराही देताना त्यांनी तुम्ही चांगलेच काम कराल असाही दिलासा दिला. नव्या विमानतळावरून पहिले विमान उडेल त्यात बायो एव्हीएशन फ्युएल आम्ही तयार करून देवू. विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर हे विमान उडेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. नागपूर विमानतळ इको फ्रेंडली व हरित विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न करू असे गडकरी म्हणाले. ९ लाख टन कार्गो आयात निर्यात होईल. नागपूरची संत्री आणि झिंगे जगभरातील बाजारात जावे अशी इच्छा आहे. विमानतळाच्या माध्यातून विदर्भासह छत्तीसगढ व तेलंगणालाही याचा उपयोग होईल. विस्तारीत विमानतळ विदर्भासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असे गडकरी म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article