Hingoli Suicide Case: पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

1 day ago 1

हिंगोली (Hingoli) :- हिंगोली शहरातील एनटीसी भागात पॉलिटेक्निकच्या (polytechnic) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने एनटीसी भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवारी 28 जानेवारीला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारमी, हिंगोली शहरातील एनटीसी (NTC)भागात जैन प्लाझा या इमारतीमधील आशुतोष मुकेश जोशी (१९) हा विद्यार्थी त्याच्या आई व लहान भावासोबत राहतो. आशुतोष हा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होता. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. घरी कोणीही नसताना त्याने घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान काही वेळाने त्याची आई व भाऊ घरी आले असताना त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद मिळालाच नाही. यामुळे दोघेही घाबरून गेले.

आशुतोष हा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होता

आशुतोष हा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्याच्या आईने या बाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत बघितले असता आशुतोष याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड, जमादार संजय मार्के, अमजद पठाण, गणेश लेकुळे, संभाजी लेकुळे, धनंजय क्षीरसागर अशोक धामणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत आशुतोष याचा मृतदेह(dead body) खाली काढून शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल केला. या घटनेमुळे एनटीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दरम्यान मृतक आशुतोष हा अभ्यासामध्ये हुशार व मनमिळाऊ विद्यार्थी होता. सोमवारी 27 जानेवारीला पॉलिटेक्निकच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये आशुतोष यास 86 टक्के गुण मिळाले आहेत. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत आशुतोष याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article