नागपूर (Nagpur) :- बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूरद्वारा रविवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सोयरीक पुस्तीकेचा प्रकाशन सोहळा, वधू वर परिचय मेळावा व जगदगुरू श्रीसंत तुकाराम महाराज जयंती उत्सव, अनुसया मंगल कार्यालय, मंगलमूर्ती चौक त्रिमूर्तीनगर येथे आयोजित केला आहे. यात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, जननायक प्रकाश पोहरे यांना समाजभूषण पुरस्कार (Samajbhushan Award) प्रदान करण्यात येणार असून समाजसेवक मुकुंद पन्नासे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार दीनानाथ माजी पडोळे राहणार आहे.
जननायक प्रकाश पोहरे यांना समाजभूषण पुरस्कार
उद्घाटन शासकीय दंत महाविद्यालयाचे (Government Dental Colleges) अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या हस्ते होईल. तसेच दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक, जननायक प्रकाश पोहरे(Prakash Pohare), समाजसेवक मुकुंद पन्नासे, प्राचार्य डॉ. विठ्ठल अरजपुरे, प्रा. डॉ. कोमल ठाकरे, प्रा. भरत इदरे उपस्थित राहणार असून यवतमाळ येथील प्रवीण देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री परिणय फुके, आ. विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार विजय घोडमारे, गिरीश पांडव, सामाजिक कार्यकर्ते नानाजी सातपुते, संस्थेचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, उद्योजक प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, माजी सदस्या वृंदा नागपुरे, माजी सभापती उज्वला बोढारे, सुनिता ठाकरे, खादी ग्रामद्योगचे माजी संचालक साहेबराव जवंजाळ प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या कार्यक्रमास जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, अध्यक्ष जानराव केदार पाटील, उपाध्यक्ष रमेशचंद्र ठवळे पाटील, सचिव अशोक पांडव यांनी केले आहे