छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहासाच्या पानात नाही..:..पण मनात तरी कधी लेझीम खेळली असेल,‘छावा’वर राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
10 hours ago
1
छावाचे लक्ष्मण उतेकर यांनी दोन दिवसांपूर्वी माझी भेट घेतली. ते उत्तम दिग्दर्शक आहेत. मी चित्रपटाचा वितरक नाही, पण संभाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत, महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, उतेकर यांच्याशी बोलताना समजले की, चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले आहे. लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. कदाचित इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी कधी त्यांनी लेझीम खेळली असेल. पण मी त्यांना म्हटले की, या दृश्यावरून चित्रपट पुढे सरकतोय की फक्त सेलिब्रेशन पुरते गाणे आहे. ते म्हणाले फक्त सेलिब्रेशन पुरते आहे. मग एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावत आहात? लेझीम खेळतानाचे दृश्य काढा राज ठाकरे म्हणाले की, प्रेक्षक जेव्हा औंरगजेब यांनी केलेले अत्याचार डोक्यात घेऊन चित्रपट पाहण्यासाठी जातील आणि त्यांना छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळताना दिसतील ते काढून टाका, अशी सूचना मी त्यांना दिली आहे. ..तर गांधींना दांडिया खेळताना दाखवले असते राज ठाकरे म्हणाले की, रिचर्ड एटनबरोने जेव्हा महात्मा गांधींवर चित्रपट केला, तेव्हा महात्मा गांधींनी केलेली आंदोलने आपल्या डोळ्यासमोर होती. कदाचित महात्मा गांधींनी चित्रपटात दांडीया खेळताना दाखविले असते तर.. कदाचित दिग्दर्शकांना तसे दाखवायचेही असेल पण त्यांच्या एकाच हातात काठी होती म्हणून ते दाखवता आले नसेल दोन्ही हातात काठी असतील तर त्यांनी तसे दाखवलेही असते. लोकांनी मनसेला मतदान केले, पण ते आपल्यापर्यंत आले नाही भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2005 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. केवळ ते आपल्यापर्यंत आलेले नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले. मात्र केलेले मतदान हे कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारे जर निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणूक न लढवलेल्या बरे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले. अर्थात काही दिवसात ही गोष्ट संपेल. कोणीही अमर पट्टा घेऊन आलेला नाही, अशा गोष्टी होत असतात, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)