Manora: वाईगौळ ते वरोली रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम थांबवून चौकशी करावी!

10 hours ago 1

निकृष्ट दर्जाचे पुल व संरक्षण बंदी कामाचीही चौकशी करावी…

मानोरा (Manora) : तालुक्यातील वाईगौळ-गादेगाव ते धानोरा-वरोली या 6.5 किमी चा सुरू असलेल्या दर्जाहीन रस्ता बांधकाम व निकृष्ट पुलाचे बांधकाम व धानोरा येथील संरक्षण बंदीचे बांधकाम तात्काळ थांबवून झालेल्या कामांची गुण नियंत्रण विभागामार्फत (Quality Control Department) चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरुध्द कार्यवाही करावी, असे निवेदन पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना परिवर्तन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनोहर राठोड यांनी पाठविले आहे.

कार्यकारी अभियंत्यांना निवेदन!

निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा तालुक्यातील ग्राम वाईगौळ-गादेदेगाव ते धानोरा-वरोली या 6.5 किमी रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावर पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून (Prime Minister’s Village Road Scheme) निधी मंजूर करत सदर रस्त्याचे दर्जोन्नती काम ठेकेदार मार्फत करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन साहित्य वापरल्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरुन डाबराचे चबडे निघत आहे.

गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी!

धानोरा गावाजवळ बनण्यात येणारी संरक्षण भीत अत्यंत बेजबाबदारपणे निकृष्ट प्रकारे बांधल्या जात आहे. पुलाचे बांधकामही (Bridge Construction) ईस्टिमेटला बगल देत दर्जाहीन साहित्याचे या पुलाच्या कामात वापर होत आहे. सध्या रस्त्याचे खडीकरणाचे काम चालू असून रस्त्यावर ईस्टिमेट मध्ये दर्शविलेल्या साहित्याचे वापर होत नसल्याने सदर कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी समिती नेमुन चौकशी करण्यात यावी.

कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार…

सदर रस्त्याच्या कामात शासनाच्या (Government) डोळ्यात धुळफेक करत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार कंत्राटदार व पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू असल्याने हे निकृष्ट दर्जाचा रस्ता व पुलाच्या बांधकामाची कालमर्यादाची किती राहील? हा प्रश्न निर्माण होत आहे, तेव्हा या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही (Proceedings) करावी व चौकशी पूर्ण होई पर्यंत देयके देण्यात येऊ नये असे तक्रार (Complaint) निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री,पालकमंत्री हसन मुश्रीफ, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी वाशिम, तहसीलदार (Tehsildar) यांना पाठविल्याचे कळविले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article