Hingoli Vidhan Sabha: हिंगोली जिल्ह्यातील ४७ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

2 hours ago 1

जिल्ह्यात एकूण ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात

हिंगोली (Hingoli Vidhan Sabha) : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात एकूण ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघातून महायुतीचे आ. तान्हाजी मुटकुळे, कळमनुरी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे आ.संतोष बांगर तर वसमत विधानसभा मतदार संघातून महायुतीचे आ.राजूभैय्या नवघरे हे विजयी झाले.

विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीत मतमोजणी नंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. हिंगोली मतदार संघात आ.तान्हाजी मुटकुळे व रूपाली पाटील गोरेगावकर यांच्यामध्ये खरी लढत झाली. त्यात आ.मुटकुळेंनी विजय मिळविला. कळमनुरी विधानसभा मतदार संघात आ.संतोष बांगर व डॉ.संतोष टारफे यांच्यात लढत होऊन आ.संतोष बांगर यांनी विजय मिळविला तर वसमत विधानसभा मतदार संघात आ.राजूभैय्या नवघरे व माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात लढत होऊन आ.राजूभैय्या नवघरे यांनी विजय मिळविला. मतमोजणीनंतर अनामत रक्कम वाचविण्यासाठी झालेल्या मतांच्या एक षष्ठांक मते घेणे आवश्यक होते.

हिंगोलीतील उमेदवाराला डिपॉझिट सुरक्षित राहण्यासाठी सुमारे ३८ हजा तर कळमनुरी आणि वसमत मतदार संघात सुमारे ४० हजार मते घेणे क्रमप्राप्त होते; परंतु यामध्ये शिवसेना उबाठाच्या रूपाली पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेना उबाठाचे डॉ.संतोष टारफे या तीनच उमेदवारांनी अनामत रक्कम वाचविण्याजोगे मताधिक्य घेतल्यामुळे त्यांचे डिपॉजिट सुरक्षित राहिले. निवडणुकीत उर्वरित अनेक अधिकृत पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष अशा ४७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.

ज्यामध्ये मतदार संघनिहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे ९२-वसमत विधानसभा मतदार संघ : ९२-वसमत विधानसभा मतदारसंघातील नागिंदर भिमराव लांडगे (बहुजन समाज पार्टी) यांना ८०६, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज (बापु) (जन सुराज्य शक्ती) यांना ३५ हजार २१९, जैस्वाल प्रिती मनोज (वंचित बहुजन आघाडी) यांना १४ हजार ०२७, मुंजाजी सटवाजी बंडे (राष्ट्रीय समाज पक्ष) ५९६ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार जगन्नाथ लिंबाजी अडकिणे यांना २७६४, तनपुरे मंगेश शिवाजी यांना २६९, बांगर रामप्रसाद नारायणराव यांना ४०२, रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी यांना ६२३, रामचंद्र नरहरी काळे यांना ५६९ आणि नोटाला १४२३ मते मिळाली आहेत.

९३- कळमनुरी विधानसभा मतदारसंघ: ९३-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजय माणिकराव बलखंडे (बहुजन समाज पक्ष) यांना ९२५, अफजल शरीफ शेख (रिपब्लीकन सेना) यांना १३१३, डॉ. दिलीप मस्के (नाईक) (वंचित बहुजन आघाडी) यांना १८ हजार २५९, मुस्ताक ईसाक शेख (हिंदुस्तान जनता पार्टी) यांना ३८४, मेहराज अ. शेख मस्तान शेख (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए- मिल्लत) यांना १५९, शिवाजी बाबुराव सवंडकर (महाराष्?ट्र स्वराज्य पक्ष) यांना ४७४, डॉ. संजय तुळशीराम लोंढे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना १६८, तर अपक्ष उमेदवार अजित मगर यांना ४२१२, उद्धव बालासाहेब कदम १३९, जाबेर एजाज शेख १३४, टार्फे संतोष अंबादास ५५३, टार्फे संतोष लक्ष्मण १९६६, देवजी गंगाराम आसोले २१८, पठाण जुबेर खान जब्बार खान १२५६, पठाण सत्तार खान १२२०, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर १९२, इंजिनिअर बुद्धभूषण वसंत पाईकराव यांना ७३२ आणि नोटाला ४३२ मते मिळाली आहेत.

९४- हिंगोली विधानसभा मतदारसंघ : प्रमोद उर्फ बंडू कुटे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांना २२८७, अ‍ॅड.साहेबराव किसनराव सिरसाठ (बहुजन समाज पार्टी) यांना १३२५, उत्तम मारोती धाबे (अखंड हिंद पार्टी) यांना ५४४, दिपक धनराज धुरिया (भारतीय जनसम्राट पार्टी) यांना ५५९, पंजाब नारायण हराळ (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना ९००, प्रकाश दत्तराव थोरात (वंचित बहुजन आघाडी) यांना २३ हजार ९४४, मुत्तवली पठाण अतिक खान ताहेर खान (मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी) यांना ४८८, रवि जाधव सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना १६३, सर्जेराव निवृत्ती खंदारे (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) यांना २८३, सुनील दशरथ इंगोले (भीमसेना) यांना २७१, सोपान शंकरराव पाटोडे (बहुजन भारत पार्टी) यांना ५१०, तर अपक्ष उमेदवार अ‍ॅड.अभिजीत दिलीप खंदारे यांना २१२४, आनंद राजाराम धुळे ९१९, अ. कदीर मस्तान सय्यद (गोरेगावकर) ७१८, गोविंद पांडुरंग वाव्हळ ४९७, गोविंदराव नामदेव गुठ्ठे १५५१, भाऊराव बाबुराव पाटील २२ हजार २६७, मुक्तारोद्दीन अजिजोद्दीन शेख ८७२, रमेश विठ्ठलराव शिंदे १९ हजार ३३६, विमलकुमार सुभाषचंद्र शर्मा ४३७, सुमठाणकर रामदास पाटील यांना १० हजार ९१८ आणि नोटाला ६६५ मते मिळाली आहेत. या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article