हिंगोली(Hingoli):- विदर्भातील जावयाने सासर्याला दिलेल्या पैशाची मागणी वारंवार करूनही सासर्याने पैसे दिले नसल्यामुळे हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथे जावयाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याप्रकरणी बासंबा पोलिसात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील घटना
याबाबत पोली सुत्राने दिेलेली माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील धुमका येथील संजय माणिक राठोड (३५) या जावयाने हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील सासरे उल्हास रेवा चव्हाण यांना दिलेली उसने पैसे दिले नाही. त्यामुळे संजय राठोड हा पैशाची मागणी करीत असताना सासर्याने त्यांना पैसे न देता वारंवार मानसिक त्रास (mental distress) दिला. हा त्रास अधिकच असह्य झाल्याने संजय राठोड याने २२ ते २३ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत दुर्गसावंगी येथे सासरी त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत २४ नोव्हेंबरला पंजाब राठोड यांनी बासंबा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरा उल्हास रेवा चव्हाण, प्रेमसिंग उल्हास चव्हाण, जिजाबाई उल्हास चव्हाण, बाली संजय राठोड या चौघांवर गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आडे हे करीत आहेत.