India vs Australia 1st test:- भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. पर्थमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला. यशस्वी जैस्वालच्या १६१ धावा आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी ५३३ धावांचे लक्ष्य देत डाव घोषित केला. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची ऐतिहासिक विजयाने सुरूवात केली आहे. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
१६ वर्षांनंतर भारताचा ऐतिहासिक विजय
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर फार धावा करता आल्या नाहीत आणि टीम इंडिया १५० धावा करत सर्वबाद झाली. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी तर कहर केला. १५० धावांच्या आघाडीसह गोलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजांनी कांगारू संघाच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. सुरूवातीच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत झटपट ३ विकेट्स गमावले. यानंतर सिराज, हर्षित राणाने बुमराहला साथ देत कांगारू फलंदाजीचे कंबरडे मोडले. १६ वर्षांनंतर भारताचा ऐतिहासिक विजय.