Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २ ऑक्‍टोबर २०२४

4 hours ago 1

जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo

चिराग दारुवाला

Published on

01 Oct 2024, 8:30 pm

Updated on

01 Oct 2024, 8:30 pm

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल

Daily Horoscope

मेष File Photo

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. मनोरंजनासाठी वेळ काढाल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. कोणत्‍याही कायदेशीर अडचणीत सापडणार नाही, याची काळजी घ्‍या. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, तुमचे काम प्रामाणिकपणे करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिकामाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.

वृषभ : ध्‍येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास तुम्हाला यश मिळेल

Daily Horoscope

वृषभFile Photo

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कुटुंबात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रमाशी संबंधित उपक्रम होतील. केवळ आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घसादुखीची समस्‍या जाणवेल.

मिथुन : सरकारी किंवा न्‍यायालयीन कामकाजात यश लाभेल

Daily Horoscope

मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज सरकारी किंवा न्‍यायालयीन कामकाजात यश लाभेल. सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरू असलेले वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाशासारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका

Daily Horoscope

कर्कFile Photo

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तरुण त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशक्य काम अचानक पूर्ण झाल्‍याने समाधान लाभेल. तुमच्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे भांडण किंवा वाद होऊ शकतो. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

सिंह : करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील

Daily Horoscope

सिंहFile Photo

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेली अराजकता दूर करण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाचे नियम बनवाल. वादविवाद टाळा. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या : हवामान बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल

Daily Horoscope

कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळाल्याने दिलासा मिळेल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाचे पालन फायदेशीर ठरतील. मात्र झटपट यश मिळवण्यासाठी कोणतेही अनुचित काम करू नका. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागले. हवामान बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

तूळ : व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका

Daily Horoscope

तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळेल. महत्त्‍वाच्‍या विषयावर चर्चा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्या उपयुक्‍त ठरेल. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदीत आनंदात वेळ जाईल.

वृश्चिक : नात्यांमधील  वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील

Daily Horoscope

वृश्चिकFile Photo

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. तुमच्‍या मेहनतीला यश मिळेल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील

Daily Horoscope

धनुFile Photo

धनु : श्रीगणेश सांगतात की, तुम्‍ही आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर बहुतांश कामे पूर्ण होतील कराल. कामाच्‍या व्यस्ततेतून वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांची जबाबदारी डोक्यावर घेतल्याने त्रास होईल. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करु नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल

Daily Horoscope

मकरFile Photo

मकर : आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देतील. इतरांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा

Daily Horoscope

कुंभFile Photo

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : वैयक्तिक जीवनाशी कोणत्याही कामात धोका पत्करू नका

Daily Horoscope

मीनFile Photo

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज संपर्कक्षेत्रात वाढ होईल. एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना या आठवड्यात कार्यान्वित होतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तरुणांना त्यांच्या कोणत्याही गोंधळातून मुक्ती मिळेल. जवळच्या नातेवाईकांसोबत संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article