Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, ३० नोव्‍हेंबर २०२४

2 hours ago 1

जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo

चिराग दारुवाला

Published on

30 Nov 2024, 2:16 am

Updated on

30 Nov 2024, 2:16 am

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आजचा गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस आहे

Daily Horoscope

मेष File Photo

मेष : आजचा गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ जाईल. आळशीपणामुळे तुम्ही कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू शकता. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रकृती चांगली राहिल.

वृषभ : तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी नियोजन कराल

Daily Horoscope

वृषभFile Photo

वृषभ : तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी नियोजन कराल. आपल्या कार्यक्षमतेवर आणि आत्म-शक्तीवर विश्वास ठेवून कार्यरत राहा. संपर्क क्षेत्रात वाढ करा. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन : आज कुटुंबातील धार्मिक यात्रेशी संबंधित योजना तयार होतील

Daily Horoscope

मिथुनFile Photo

मिथुन : आज कुटुंबातील धार्मिक यात्रेशी संबंधित योजना तयार होतील. आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवल्याने आराम आणि आनंद मिळेल. ज्येष्ठांच्‍या सल्‍ल्‍याकडे दुर्लक्ष करु नका. खर्चामुळे तणाव असू शकतो. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. तरुणांनी मौजमजा करण्यापेक्षा त्यांच्या करिअर आणि भविष्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : ग्रहस्थिती अनुकूल होत आहे

Daily Horoscope

कर्कFile Photo

कर्क : ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क भविष्‍यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्‍या अति हस्तक्षेपामुळे कुटुंबातील सदस्‍यांना त्रास होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रातील कामांकडे दुर्लक्ष करु नका. पती-पत्नीचे नाते मधुर रहिल. खोकला, ताप, सर्दीचा त्रास होवू शकतो.

सिंह : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा कामात यश मिळेल

Daily Horoscope

सिंहFile Photo

सिंह : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा कामात यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. कोणत्याही सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरणात थोडी निराशा होऊ शकते. समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंददायी राहील. घशातील संसर्ग आणि कफ संबंधित समस्या असू शकतात.

कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल

Daily Horoscope

कन्याFile Photo

कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय आणि गंभीर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. घरातील कोणतीही समस्या रागावण्याऐवजी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. असंतुलित दिनचर्येमुळे पोट खराब राहिल.

तूळ : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल

Daily Horoscope

तूळ File Photo

तूळ : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी काही प्रकारचे मतभेद असू शकतात. कोणत्‍याही परिस्‍थिीतत संयम ठेवा. अन्यथा तुमची छाप खराब होऊ शकते. काही वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. पती-पत्नी व्यस्ततेमुळे घरात फारसे लक्ष देऊ शकणार नाहीत. मसालेदार पदार्थ टाळा.

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जास्त कामात व्यस्त असाल

Daily Horoscope

वृश्चिकFile Photo

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जास्त कामात व्यस्त असाल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. आर्थिक व्‍यवहाराचे नातेसंबंधांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्‍या. घरातील वातावरण आनंददायी राहील. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु : आज जवळच्या लोकांशी निवांत भेट होईल

Daily Horoscope

धनुFile Photo

धनु : आज जवळच्या लोकांशी निवांत भेट होईल. कोणत्याही महत्त्‍वाच्‍या विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. चुकीच्या कामांवर जास्त खर्चाने मानसिक त्रास होईल. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता राखणे गरजेचे आहे. प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात

Daily Horoscope

मकरFile Photo

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, याची जाणीव ठेवूनच कार्यरत राहा. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्तता राहील. अतिआत्मविश्वास टाळा. कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार कार्य करा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. घरातील वातावरण आनंददायी राहिल. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्‍यावी.

कुंभ : सामाजिक कार्यात आज तुमचे निस्वार्थ योगदान राहील

Daily Horoscope

कुंभFile Photo

कुंभ : सामाजिक कार्यात आज तुमचे निस्वार्थ योगदान राहील. मनःशांती मिळेल आणि आदरही वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात, त्यावर लक्ष केंद्रित करा. घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक होणार नाही याची काळजी घ्‍या. बेकायदेशीर लोकांपासून दूर राहा. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकतात. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.

मीन : जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल

Daily Horoscope

मीनFile Photo

मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घराच्या व्यवस्थेबाबतपती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article