कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात अभिषेक शर्मा याने धमाका केला. अभिषेक शर्मा याने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियमध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाच्या फंलदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. इंग्लंडचा 97 धावांवर खुर्दा उडवत टीम इंडियाने 150 धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. अभिषेक शर्मा याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. अभिषेकने 2 विकेट्स घेतल्या. अभिषेकला या ऑलराउंडर कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
अभिषेकने या सामन्यात विक्रमी खेळी केली. अभिषेकने 54 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावा ठोकल्या. अभिषेकच्या खेळीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली, परिणामी मोठ्या फरकाने जिंकता आलं. टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी 2023 साली इंग्लंडवर 168 धावांनी मात केली होती. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा टी 20i विजय आहे.
हे सुद्धा वाचा
अभिषेक हा टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला. मात्र टीम इंडियाच्या या मालिका विजयाचा हिरो ठरला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला. वरुणने या मालिकेतील 5 सामन्यांत एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणने या दरम्यान एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. वरुणने घेतलेल्या 14 विकेट्ससाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
वरुणची सामेननिहाय कामगिरी
वरुण चक्रवर्ती याने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. राजकटमध्ये झालेल्या तिसर्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. चेन्नईत 2 तर कोलकातामध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
वरुण चक्रवर्ती मॅन ऑफ द सीरिज
For ending the bid with an awesome 14 wickets, Varun Chakaravarthy is the Player of the Series 👏
Scoreboard ▶️ https://t.co/B13UlBNLvn#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @chakaravarthy29 pic.twitter.com/tVaMGvFKj3
— BCCI (@BCCI) February 2, 2025
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.