वर्धा (Karale Sir) : उमरी येथे मतदान बुथवर चांगलाच राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे (Karale Sir) यांना चांगलाच चोप दिला. गुरुजींना बदडल्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत उशिरापर्यंत दोन्ही पोलीस ठाण्यात होते.
मांडवा येथून नीतेश कराळे मतदान करून वर्धेकडे परत येत होते. वर्ध्याकडे येताना उमरी येथे थांबत बूथवर गेले. त्यावेळी भाजपच्या बुथवर जावून बूथ नियमबाह्य असल्याचं सांगत शाब्दीक वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी ही बाब उमरीचे सचिन खोसे यांना सांगितली. सचिन खोसे तेथे आले आणि समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाब्दीक चकमक उडाली. त्यातून वाद झाला आणि बाचाबाची होऊन (Karale Sir) कराळे गुरुजींना चांगलाच चोप दिला. दरम्यान, काही जणांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही गट सावंगी पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली. दरम्यान, या प्रकरणाबाबत वृत्तलिहेस्तोवर पुढील कार्यवाही सुरू होती.