Kardgaon villagers strike: परभणीच्या आ. डॉ. राहुल पाटलांचे आश्वासन; करडगाव ग्रामस्थांचे उपोषण मागे

7 hours ago 2

जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संपर्क
पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे दिले आश्वासन

देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Kardgaon villagers strike) : येथील समृद्धी महामार्गाच्या मोबदल्याकरिता करडगाव गावांतील असंख्य महिला व पुरुष शेतकरी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते. याबाबत परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी गुरुवार ३० जानेवारी रोजी करडगावात सदरील उपोषण स्थळी जात शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलल्यानंतर लवकरच तुमच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत उपोषणकर्त्यांना नारळ पाणी दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे सहा दिवसापासून चालू असलेले आमरण उपोषण मागे घेतले.

समृद्धी महामार्गाच्या मोबदल्याकरिता करडगावातील (Kardgaon villagers strike) असंख्य महिला व पुरुष शेतकरी शनिवार २५ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणास उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले होते .मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाहित.असे सांगितले होते. त्यानंतर उपोषणादरम्यान दोन शेतकऱ्यांची प्रकृतीही खालावली होती.

त्यांना जिल्हा रुग्णालात उपचारा करिता दाखल करण्यात आले होते. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर परभणीचे आमदर डॉ. राहुल पाटील यांनी गुरुवारी करडगावात जात आमरण उपोषण (Kardgaon villagers strike) करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तात्काळ त्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी मोबाईल द्वारे संवाद साधला व लवकर सदरील शेतकऱ्यांची बैठक बोलवा व त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील ते पहा. असे सांगितले .जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ सदरील शेतकऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक बोलावतो असे सांगितले. आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर सदरील उपोषणाला बसलेल्या सर्व शेतकऱ्यांनी नारळ पाणी घेत (Kardgaon villagers strike) उपोषण मागे घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article