Khaparkheda :स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, खापरखेडा यांना प्रतिष्ठित “बँको ब्लू रिबन पुरस्कार – 2024”

3 hours ago 1

खापरखेडा (Nagpur) :- स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, खापरखेडा यांना “बँको ब्लू रिबन पुरस्कार – 2024” हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अंबे वॉली सिटी, लोणावळा येथे झालेल्या भव्य सोहळ्यात संस्थेला प्रदान करण्यात आला.

“बँको ब्लू रिबन पुरस्कार – 2024” हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल प्रभाकर गोमकाळे, तसेच श्री. तुषार गोरले आणि श्री. पवन गोमकाळे हे विशेष उपस्थित होते. या सन्मानामुळे संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची आणि पारदर्शक कारभाराची दखल घेतली गेली आहे. पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष श्री. अनिल प्रभाकर गोमकाळे म्हणाले, “हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीचे फळ आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यातही आम्ही संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेऊ.”

हा पुरस्कार सहकारी बँकिंग आणि पतसंस्थांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑप सोसायटीने आपल्या उत्तम आर्थिक व्यवस्थापन, सभासदसेवा आणि तांत्रिक सुधारणा यामुळे हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article