लातूर (Latur) :- लातूर जिल्ह्यातील 2020 पासून ते 2024 पर्यंतच्या कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) राबविण्यात येणाऱ्या खरीप आणि रब्बी पीक स्पर्धां विजेते व उपविजेत्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय कृषी नवनिर्माण 2025 प्रदर्शनात कृषी महाविद्यालयाचे (Colleges of Agriculture) प्राध्यापक डॉक्टर अरुण गुट्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भीमराव सिद्रामअप्पा डोणगापुरे यांना तूर पीक उत्पादनाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार (2022-23) मिळाल्याने यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
शेतकरी बांधवांचा मनसेकडून सत्कार
यावेळी व्यासपीठावर आदर्श शेतकरी माधवराव चव्हाण, कृषी प्रदर्शनाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, शहराध्यक्ष मनोज अभंगे, शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे, मनसे रोजगार स्वयंरोजगार राज्य चिटणीस सचिन सिरसाट, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रीतीताई भगत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी माधवराव चव्हाण, माधव देवराय, हरिश्चंद्र चामले, मेघराज पाटील, अरुण शिंगरे, रवी कटके, शेळके चंद्रसेन, कचरूसिंह ठाकूर, जीवनराव देशमुख, प्रभाकर हांडे, शिरीष बिरादार, हनुमंत उगिले, गोविंदराव मोरे, गुलाब शेख यांच्यासह अन्य शेतकरी बांधवांचा मनसेकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी योगेश सूर्यवंशी, परमेश्वर, बालाजी पवार आदींसह अनेक मनसैनिकांनी परिश्रम घेतले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी मानले.