LLC 2024 : कॅप्टन शिखरचं अर्धशतक वाया, कार्तिकच्या संघाकडून 26 धावांनी मात, सदर्न सुपर स्टार्सची विजयी सलामी

2 hours ago 2

टीम इंडियाचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आपल्या नव्या इनिंगची तडाख्यात सुरुवात केली आहे. कार्तिकने आपल्या नेतृत्वात लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत सदर्न सुपर स्टार्स संघाला विजडयी सुरुवात करुन दिली आहे. स्पर्धेतील चौथ्या सामन्यात सदर्न सुपर स्टार्स विरुद्ध शिखर धवनच्या नेतृत्वातील गुजरात ग्रेट्स संघात हा सामना पार पडला. कार्तिकच्या संघाने धवनच्या टीमला विजयासाठी 145 धावांच आव्हान दिलं होतं. धवनने शानदार अर्धशतक ठोकत टीमला विजयानजीक आणून ठेवलं. मात्र कार्तिकच्या संघाने अखेरच्या क्षणी कमबॅक केलं आणि गुजरातला 20 षटकात 9 बाद 118 धावांवर रोखलं. अशाप्रकारे सदर्न सुपर स्टार्सने हा सामना 26 धावांनी जिंकला.

गुजरातकडून शिखर धवन याने 52 धावांची खेळी केली. धवनने 48 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. मात्र धवनव्यतिरिक्त गुजरातकडून इतर फलंदाजांनी गुडघे टेकले. मॉर्न व्हॅन विक आणि मनन शर्मा या दोघांनी 15 आणि 10 अशा धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना काही खास करता आलं नाही. सदर्न सुपर स्टार्सकडून पवन नेगी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अब्दुल रझ्झाक याने सलग 2 विकेट्स मिळवल्या. तर चथुरंगा डी सिल्वा आणि केदार जाधव या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

डीकेच्या संघाची विजयी सुरुवात, धवनच्या टीमचा धुव्वा

De Silva’s sound proved to beryllium important ✌️#BossLogonKaGame #SSvGG #LegendsLeagueCricket #LLCseason3 #LLCT20 #Jodhpur pic.twitter.com/IchKcXjGYq

— Legends League Cricket (@llct20) September 23, 2024

सदर्न सुपर स्टार्स प्लेइंग इलेव्हन : दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, पार्थिव पटेल, हॅमिल्टन मसाकादझा, केदार जाधव, चिराग गांधी, पवन नेगी, चथुरंगा डी सिल्वा, सुबोथ भाटी, सुरंगा लकमल आणि मोनू कुमार.

गुजरात ग्रेट्स प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), लेंडल सिमन्स, मोहम्मद कैफ, असगर अफगाण, मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), मनन शर्मा, कामाऊ लेव्हरॉक, सीकुगे प्रसन्ना, एस श्रीशांत, लियाम प्लंकेट आणि शॅनन गॅब्रिएल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article